पिंपरी (Pclive7.com):- जुनी सांगवी परिसरात मित्रांसोबत बोलत उभ्या असलेल्या तरुणावर जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने कोयता, दांडके व बेल्टने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात १२ आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रथमेश कवडे (वय. २१ रा. मधुबन कॉलनी गणपती मंदिर समोर जुनी सांगवी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आयुष नरेश गोहिरे, विराज अदिकराव काटे, ऋतिकेश गोहिरे, सिद्धार्थ निकाळजे, सागर जगदनकर, आर्यन थोरात, हर्षद आदिकराव काटे, शुभम बाळासाहेब ढवळे, सार्थक कदम, साहिल औदुंबर पाटील, गुंड्या उर्फ मयांक गायकवाड, रित्या गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.१८) रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील गणपती मंदिराजवळील परिसरात हा प्रकार घडला. प्रथमेश कवडे व त्यांचा मित्र आदित्य गायकवाड हे बोलत उभे असताना अचानक आरोपींनी एकत्र येत शिवीगाळ करत हल्ला चढवला. कोयत्याने वार करत, दांडके व बेल्टने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात प्रथमेश गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोके, छाती व पायाला मार लागला आहे.

या हल्ल्यावेळी आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत “आमच्या नादाला कोणी लागला तर सोडणार नाही” अशा धमक्याही दिल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ अरविंद पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group