
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील प्रभाग क्र.२० संत तुकारामनगर – महात्मा फुलेनगर – लांडेवाडी – कासारवाडी हा प्रभाग पिंपरी चिंचवडमधील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा प्रभाग आहे. या प्रभागातून अनेक प्रस्थापित विविध पक्षांकडून इच्छुक आहेत. परंतू अशा मातब्बर प्रस्थापितांच्या भाऊ गर्दीत या प्रभागातील जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून सौ. वैजयंती संदीप ढेरंगे/राक्षे यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

आतापर्यंत निवडूण आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांनी प्रभागातला कुठलाही प्रश्न मार्गी न लावल्यामुळे या प्रभागातील जनतेला आता बदल हवा आहे. म्हणुन येणा-या महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभागातील जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून विविध सामाजिक संघटनेकडून सर्वाधिक सौ. वैजयंती संदीप ढेरंगे यांना पाठींबा मिळत आहे. त्याच धर्तीवर भारतीय दलित पँथर या सामाजिक संघटनेनेही आपला पाठींबा दर्शविला आहे. या पाठींब्याच्या जोरावरच या उमेदवार बाजी मारतील अशी चर्चा आहे.

प्रभाग क्र.२० मधील वैजयंती ढेरंगे/राक्षे यांना निवडूण आणण्यासाठी प्रभागातील जनतेने सर्व शक्तीने मैदानात उतरावे असे आवाहनही भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष राजू सरोदे यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group