पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर’च्या वतीने सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी ‘मोफत विमा नोंदणी अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानाअंतर्गत शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत मोफत विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे अभियान दि.२० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मोरवाडी, पिंपरी येथील भाजपा शहर कार्यालय (एम.एस.आर कॅपिटल) येथे पार पडणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
२ पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे.

या उपक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
दिनेश दिवानजी काटे, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) – 9881747780
हिना मेहबूब मुलाणी, उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) – 7028702630
संयोजक: दिनेश लालचंद यादव, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा).



















Join Our Whatsapp Group