पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १५ निगडी, प्राधिकरणाचे माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गावडे यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यावेळी उपस्थित होते. अमित गावडे हे २०१७ मध्ये शिवसेनेकडून महापालिकेवर निवडून आले होते. मागील नऊ वर्षे प्रभागातील विकास कामांसाठी गावडे यांनी झपाटून कामाला सुरुवात केली. जनतेशी समरस होऊन गावडे हे काम करीत आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिक गावडे यांच्या कामावर समाधानी आहेत. चोवीस तास जनतेसाठी सहज उपलब्ध होणारे नगरसेवक म्हणून गावडे यांची ओळख आहे.

अमित गावडे हे वर्षेभर सातत्याने विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम, उपक्रम राबवितात. प्राधिकरणातील जेष्ठांसाठी सदैव उपलब्ध असतात. त्यांच्या मदतीला धावून जातात. हिंदुत्ववादी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आता गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाचे प्रभागातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. निगडी, प्राधिकरणात भाजपची ताकद वाढली आहे.

याबाबत अमित गावडे म्हणाले, ‘मागील नऊ वर्षांपासून प्रभागात काम करीत आहे. नगरसेवकपदाच्या पाच वर्षांच्या कालावधीत प्रभागाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला. विकासाला गती देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रभागातील अपूर्ण असलेली कामे पूर्ण केली जातील. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे’.






















Join Our Whatsapp Group