
भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी धावडेवस्ती प्रभाग क्रमांक ०६ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून रवी लांडगे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मंगळवारी करण्यात येणार आहे. “चला प्रचाराला, लोकाभिमुख राजकारणासाठी!” या संदेशासह हा प्रचार शुभारंभ मंगळवार, दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या प्रचाराची सुरुवात परिसरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन करण्यात येणार आहे. सिद्धेश्वर मंदिर (निवासस्थान), गणेश मंदिर (भगतवस्ती), भैरवनाथ मंदिर (गुळवेवस्ती), बापुजी बाबा मंदिर (भोसरी गावठाण), ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (PMT चौक), श्रीराम मंदिर (चक्रपाणी वसाहत), दुर्गामाता मंदिर, महादेव मंदिर, गणराज मंदिर, दत्त मंदिर, सत्यनारायण मंदिर, साईबाबा मंदिर आदी ठिकाणी दर्शन व नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.























Join Our Whatsapp Group