पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर – चक्रपाणी वसाहत येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जालिंदर किसन शिंदे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज मंगळवार, दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.

हा प्रचार मेळावा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पीएमटी चौक, भोसरी येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

प्रभागातील विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसमावेशक विकासाचा संकल्प या प्रचार शुभारंभातून मांडण्यात येणार आहे. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी या प्रचार मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जालिंदर शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group