पिंपरी (Pclive7.com):- इंदिरा स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येणाऱ्या बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, बसमधील विद्यार्थ्यांना यापूर्वीच शाळेत सोडण्यात आले होते. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

मात्र शालेय बसची नियमित तांत्रिक तपासणी, देखभाल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाकड येथील काळाखडक परिसरात ही घटना घडली.

विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर परतत असताना बसच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने बस गॅरेजमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅरेजकडे जात असतानाच बसने अचानक पेट घेतला.
विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली असती तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांना आधीच सुरक्षितपणे शाळेत सोडण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.





















Join Our Whatsapp Group