पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला तब्बल ४ लाख २४ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपीचा माग काढण्यासाठी विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सुमारे १०० हून अधिक फुटेजची बारकाईने पाहणी केल्यानंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

अटकेतील आरोपीकडून चोरीतील खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे –
सुमारे २ लाख २८ हजार ४८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने.
६० हजार रुपये किमतीचे डायमंड पिलर्स (२७ नग).
४० हजार रुपये किमतीचे स्टेनलेस स्टीलचे पाइप व इतर साहित्य.
१ लाख रुपये किमतीची मोटारसायकल.
अशाप्रकारे एकूण ४ लाख २४ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा यूनिट ३ चे पोलीस निरीक्षक संतोष कसब, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अमंलदार सोमनाथ बोहाडे, खेडकर, शशिकांत नागरे, समिर काळे, स्वप्निल महाले यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group