पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील पवना नदी घाट परिसरातील बाबा छत्तुराम झुलेलाल मंदिर येथे गुरुवार, दि.२० ऑगस्ट २०२६ रोजी ‘श्री झुलेलाल जो चालियो साहेब’ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होणार असून सिंधी समाजातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या विशेष कार्यक्रमाला साई वसनशाह दरबार, उल्हासनगर-५ येथील बाबा साई कालीराम साहेब (सर्वात मोठे गुरु) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या सान्निध्यात सत्संग, भजन आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान झुलेलाल यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करत समाजात एकात्मता, बंधुभाव आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश दिला जाणार आहे. यानिमित्ताने आयोजकांनी सर्व श्रद्धाळूंना उपस्थित राहून बाबा साई कालीराम साहेब यांचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा..
दिनांक : २० ऑगस्ट २०२६
वेळ : रात्री ९.०० वाजता
स्थळ : बाबा छत्तुराम झुलेलाल मंदिर, नदी घाट, पिंपरी, पुणे – १७
सिंधी समाजासह सर्व धर्मीय नागरिकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group