पिंपरी (Pclive7.com):- काँग्रेस नेते, संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे उद्या शनिवारी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील आरटीओ ऑफिस शेजारील एस एस पी एम एस कॉलेज मैदानावर पुण्यातील जेन झी विद्यार्थीनी आणि युवतींशी छात्रो की गुंज महिला विशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

सर्व प्रथम सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची ज्योत पुण्यात पेटवली, देशात स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली, ते पुणे पुढे शिक्षणाचे मोठे केंद्र आणि माहेरघर बनले, त्याच पुण्यात.आणि देशभरातच आज विद्यार्थिनी आक्रोश करत आहेत त्यांच्या आक्रोशाला तुमचा आवाज, तुमची ताकद, तुमचे भविष्य या त्रिसूत्रीवर राहुल गांधी कडून संवाद साधला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना न्याय देणार संपूर्ण अपयशी ठरलेल्या या भाजप सरकारच्या विरोधात राहुल गांधी यांच्या कोटा राजस्थान, प्रयागराज, देहरादून नंतर आता चॅप्टर फोर छात्रो की गुंज पुण्यात होणार आहे.

गेल्या बारा वर्षांमध्ये या भाजप सरकारच्या काळामध्ये जवळपास सुमारे दीडशे वेळा विविध पेपर फुटीची प्रकरणे झाली, नुकत्याच झालेल्या नीट च्या पेपर फुटी ने विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये निराशेत गेला त्यातून 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या जंतरमंतर येथील आंदोलनाला हिंसक पद्धतीने हाताळण्यात आले, रोजगाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची पदवीधरांची गळचेपी केल्या बारा वर्षापासून सुरू आहे, तसेच विद्यार्थिनी युवती अत्याचाराच्या घटना देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षा, रोजगार, सुरक्षा आणि समानता या चार मुद्द्यांवर छात्रो की गुंज अंतर्गत राहुलजी पुण्यात थेट संवाद साधणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी, चाकण परिसरातील अनेक कंपन्या या स्थलांतरित झाल्या आहेत. येथील युवकांचा रोजगार संपतो आहे. या सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध राहुलजींच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनी युवती महिला यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपला आक्रोश नोंदवा आपल्या बाजू मांडाव्यात पुढील दिशा समजून घ्यावी असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.– नरेंद्र बनसोडे(अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस)




















Join Our Whatsapp Group