
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ताकतीचे नेते माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचा आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. भाजप प्रवेशासाठी ते मुंबईला रवाना झाले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून राहुल कलाटे भाजपात प्रवेश करणार की राष्ट्रवादीत या बाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले होते. अजित पवारांच्या संपर्कानंतर कलाटे यांचा फडणवीसांसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे सर्वाधिक चर्चेत आलेला हाय व्होल्टेज प्रवेश आज मुंबईत होत असून पिंपरी चिंचवड शहराची राजकीय गणिते बदलणार असल्याचे बोलले जात आहे.























Join Our Whatsapp Group