रुपीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात; नागरिकांकडून उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. नवखे उमेदवार शरद भालेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि युवकांच्या उपस्थितीत प्रभागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.

रुपीनगर प्रभागातील गणेश कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी परिचय पत्रकांचे वाटप केले. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषतः महिलांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भालेकर, शरद भालेकर, सौ. सीमा धनंजय भालेकर व सौ. चारुलता सोनवणे यांच्या परिचय पत्रकांसह पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विकासकामांची माहिती देणारे पत्रक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. “राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो” आणि “विश्वास जुना, राष्ट्रवादी पुन्हा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

प्रभाग क्रमांक १२ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असून, याच पार्श्वभूमीवर महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले. प्रचारातील वाढता प्रतिसाद आणि जनसहभाग पाहता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने या प्रभागात आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.






















Join Our Whatsapp Group