पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, एकूण 272 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. या बदल्यांमुळे विविध विभागांच्या कामकाजात मोठे फेरबदल होणार असून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 75 कनिष्ठ अभियंते, 36 उपअभियंते, 103 लिपिक तसेच 58 मुख्य लिपिक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच विभागात कार्यरत असल्याने प्रशासनाने नियमानुसार ही बदली प्रक्रिया राबविल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांसह अभियांत्रिकी, प्रशासकीय आणि लेखा विभागांमध्ये या बदल्यांचा प्रभाव दिसून येणार आहे. नव्या ठिकाणी नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या व्यापक बदली प्रक्रियेमुळे विभागीय कामकाजात समन्वय वाढण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने प्रशासनाला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेतील या मोठ्या बदल्यांमुळे कर्मचारी वर्गातही विविध चर्चांना उधाण आले आहे.




















Join Our Whatsapp Group