नारायण बहिरवाडे यांच्या पुढाकाराने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; भाविकांची मोठी उपस्थिती
पिंपरी (Pclive7.com):- शाहूनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ मंदिरात सामूहिक तुळशी विवाह सोहळा आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने मंदिरात आकर्षक दीपसजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या लखलखाटाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता. सामूहिक तुळशी विवाह सोहळा आणि दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. धार्मिक विधी आणि दीपोत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाचे नियोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू गुणवंत, हरिनारायण शेलके काका, दीपक पाटील तसेच महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सारिका रिकामे, स्नेहा गुणवंत, शमा काळे, अंजली देव, रंजना राणे आणि लता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांच्या माध्यमातून धार्मिक परंपरांचे जतन करण्याबरोबरच भाविकांमध्ये सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि एकजूट वाढविण्याचे कार्य केले जात आहे.

















Join Our Whatsapp Group