पिंपरी (Pclive7.com):- कामगार विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार अंकुश तुकाराम जाधव यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अंकुश जाधव हे गेली 28 वर्ष किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि, खडकी येथे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभागात कार्यरत आहेत. जाधव यांचा प्रॉडक्टिव्हिटी, कॉलिटी, सेफ्टी, एनर्जी कंजर्वेशन, यावरील विविध स्पर्धेमध्ये नेहमी सहभाग असतो. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. सजेशन आणि कायझनच्या माध्यमातून कंपनीच्या उत्पादन वाढीसाठी मोलाचा वाटा उचलला आहे. लो कॉस्ट ऑटोमेशन करून अनेक टेस्टरीघ इन हाऊस त्यांनी बनविल्या आहेत. कंपनीच्या कला, क्रीडा समितीमध्येही त्यांनी कामे केली आहेत.

सध्या एनकॉन कमिटी, सेफ्टी कमिटीचे ते सदस्य आहेत. ते उत्तम सूत्रसंचालक आहेत. तसेच क्रीडा समालोचकही आहेत. ते युनियनच्या आयआर कमिटीमध्ये काम करतात. त्यांनी किर्लोस्कर एम्प्लॉईज सोसायटीचे संचालक व व्हाईस चेअरमन म्हणून काम केले आहे.
कंपनीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये जाधव यांचा सहभाग असतो. कामगारांचे प्रश्न सोडण्यामध्ये त्यांना अधिक रुची आहे. ते सामाजिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक, कामगार कल्याण मंडळाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेत आले आहेत. त्यांना किर्लोस्करचे चेअरमन अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर गौरी किर्लोस्कर यांनी त्यांना एमडी अवार्डने सन्मानित केले आहे.

अंकुश जाधव हे कामगार युनियनचे आयआर कमिटी मेंबर, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स एम्प्लॉईज सोसायटीचे संचालक व उपाध्यक्ष, सेफ्टी कमिटी एनकॉन कमिटीचे सक्रिय मेंबर, सरदार वल्लभाई पटेल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मित्र मंडळ, सुवर्ण पार्क, पिंपळे गुरवचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. दिलासा संस्था, लक्ष्मण नागरी पतसंस्थेचे ते माजी संचालक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.




















Join Our Whatsapp Group