महात्मा फुले नगर येथील श्री गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात
पिंपरी (Pclive7.com):- कृष्णा नगर प्रभाग क्रमांक ११ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी महिला ‘ब’ गटातून इच्छुक उमेदवार असलेल्या सौ. रिटाताई सचिन सानप यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले नगर येथील श्री गणेश मंदिरात विधिवत पूजन व नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवार, ज्येष्ठ पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. रिटाताई सानप यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि समर्थन व्यक्त करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावत प्रचार शुभारंभाला जनसमर्थनाचे स्वरूप प्राप्त झाले.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडून ज्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी जाहीर होईल, त्याच उमेदवाराच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “आपकी बार – एक सौ पंचवीस पार” अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या प्रसंगी आप्पासाहेब सायकर, निलेश नेवाळे, योगिता नागरगोजे, कुंदन गायकवाड, कविता हिंगे, संतोष ठाकूर, महादेव कवितके, हिंदुराव पाटील, सुधाकर धुरी, अरुण पाडुळे, सुनिता जगताप, कुणाल खोरे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
कृष्णा नगर प्रभागातील विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगती या मुद्द्यांवर केंद्रित असलेला हा प्रचार पुढील काळात अधिक व्यापक जनजागृती घडवून आणेल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी संघटितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे चित्र या प्रचार शुभारंभातून स्पष्ट झाले.






















Join Our Whatsapp Group