पिंपरी (Pclive7.com) :- अॉल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) पिंपरी चिंचवड शहर शाखा यांच्या तर्फे धनगर समाजातील १०वी १२वी तसेच विशेष उल्लेखनीय कार्य केलेले विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ घेण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. यात १५० विद्यार्थीं आणि १५ विशेष सत्कार घेण्यात आले.
या कार्यक्रमला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध व्याख्याते डॉ.यशपाल जी भिंगे, नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे, अॉल इंडिया धनगर समाजाचे राष्ट्रीय मार्गदर्शक अमरजित राजे बारगळ, प्रदेशाध्यक्ष प्रविणजी काकडे, धनगर कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतबापु सुळ, पुणे शहर अध्यक्ष सुनिल शेंडगे, पालिका उपअभियंता तथा BRTS प्रवक्ता विजय भोजने, नगरसेवक तुषार हिंगे, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, सुर्यकांत गोफणे, गजानन वाघमोडे, प्रभाताई दुर्गे, आशा काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन तळपे सर, यशोदा नाईकवाडे यांनी केले. महावीर काळे यांनी प्रस्ताविक केले. संतोष पांढरे यांनी आभार मानले. डॉ. यशपाल भिंगे सरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी शहर अध्यक्ष दिपक भोजने, सुनिल बनसोडे, संजय नाईकवाडे, बंडु मारकड, हिराकांत गाडेकर, नवनाथ देवकते, संतोष पांढरे, संजय कवितके, महादेव थोरबोले, प्रदिप वाघमोडे, विजय महानवर, शिवराम ठोंबरे, काका मारकड, राम दुधभाते, तानाजी कोपनर, गोवर्धन कांबळे, धनाजी गाडे, दत्ता माने, फुलचंद बनसोडे, अंबादास पडळकर, नागनाथ वायकुळे, विनय खामगळ, दादासाहेब कोपनर, तानाजी कोपनर, गणेश एकल यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने समाजबंधू उपस्थित होते.