पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ (निगडी गावठाण, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, सेक्टर २२, यमुनानगर) मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवारांनी आज देवदर्शनाने आपल्या प्रचाराची विधीवत सुरुवात केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून श्री. शशिकिरण पंढरीनाथ गवळी (अ गट – अनुसूचित जाती), सौ. अश्विनी सचिन चिखले–मराठे (क गट – सर्वसाधारण महिला) व श्री. सचिन तुकाराम चिखले (ड गट – सर्वसाधारण पुरुष) यांनी प्रभागातील विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेत जनतेच्या सुख, समृद्धी व विकासासाठी प्रार्थना केली.देवदर्शनानंतर उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न, विकासकामे, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. “जनतेचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सर्वांगीण विकास” हेच आपल्या प्रचाराचे प्रमुख सूत्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवदर्शनाने सुरू झालेल्या या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक १३ मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.























Join Our Whatsapp Group