चिंचवड (Pclive7.com):- मराठी रंगभूमीवर विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘शंकर जयकिशन’ या बहुचर्चित नाटकाचा शुभारंभ प्रयोग उद्या, रविवार दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगणार आहे.

विराजस कुलकर्णी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सुरज पारसनीस यांनी केले असून, नाटकाचे सादरीकरण प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आहे. नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असून कलाकारांची केमिस्ट्री हे नाटकाचे खास आकर्षण आहे.

नातेसंबंध, मैत्री आणि गोंधळातून उलगडणाऱ्या विनोदी प्रसंगांची गुंफण असलेले हे नाटक सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल, असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. नाटकाची तिकीटे प्रेक्षागृहावर तसेच बुक माय शो आणि टिकिटालय या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहेत. फोन बुकिंगसाठी ९६०२०२७६७६ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील नाट्यरसिकांसाठी हा प्रयोग एक पर्वणी ठरणार असून, विनोदप्रेमींनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group