पिंपरी (Pclive7.com):- मोहन नगर, काळभोर नगर, आकुर्डी प्रभाग क्रमांक १४ मधील भाजपा–आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवार व माजी नगरसेविका सौ. मीनलताई विशाल यादव यांनी गेल्या पंचवार्षिक कालावधीत केलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर अहवाल आज चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक तुषार हिंगे, आयुष निंबाळकर, कमलेश मुथा, कैलास कुटे, प्रसाद शेट्टी, अमित बाबर यांच्यासह भाजप व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अहवालामध्ये गेल्या पाच वर्षांत प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. विद्युत सुविधा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांचे काम, गाय- वासरू शिल्प, दीपमाळ उभारणी, काँक्रीट रस्ते, प्रधानमंत्री आवास योजना, शाळांचे नूतनीकरण, अक्षरबाग विकास, तसेच स्वच्छता व साफसफाईच्या कामांचा समावेश या अहवालात करण्यात आला आहे.

प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा हा अहवाल नागरिकांसमोर मांडण्यात आला असून, आगामी काळातही विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचा निश्चय मीनलताई यादव यांनी या अहवालाच्या माध्यमातून केला आहे.





















Join Our Whatsapp Group