पिंपरी (Pclive7.com):- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणा-या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावात त्यांचे भव्य सहा मजली राष्ट्रीय संग्रहायल उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आज सोमवारी (दि.२३) सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
याबाबतची माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, बाबू नायर, माउली थोरात, प्रदेश नेत्या उमा खापरे, महिला अध्यक्षा शैला मोळक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group