काळेवाडी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (विजयनगर–काळेवाडी) मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अक्षरशः रंगात आला. सकाळपासूनच परिसरात कार्यकर्त्यांची लगबग, ताशांचा गजर, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमुळे निवडणुकीचे वातावरण तापलेले पाहायला मिळाले.

या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र तापकीर, संतोष कोकणे, मोनीका नढे आणि उषा काळे हे चौघेही मतदारांच्या थेट संपर्कात उतरले होते. ‘घड्याळ’ या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर बटण दाबून चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रचारादरम्यान मोरया कॉलनी, गणेश कॉलनी, जोगेश्वरी हॉस्पिटल परिसर, विजयनगर आदी भागांत पदयात्रा काढण्यात आली. स्थानिक नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “गतिशील विचार… विकासात्मक धोरण…!” या घोषवाक्याखाली प्रचार करण्यात आला. परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार व खेळाच्या सुविधा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते.

उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला. “आम्ही केवळ आश्वासन देणारे नाही, तर काम करून दाखवणारे आहोत,” असा ठाम विश्वास उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला. विशेषतः महिलांनी महिला उमेदवारांना भरभरून पाठिंबा दर्शवत, “आमच्या प्रश्नांसाठी हक्काची माणसं मैदानात उतरली आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली.
“प्रभाग २२ मधील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांत विकासासाठी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. आम्ही या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. या निवडणुकीत जनतेसमोर विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन आलो आहोत. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांसाठी ठोस योजना राबवण्याचा आमचा निर्धार आहे. ‘घड्याळ’ हे चिन्ह म्हणजे विश्वास, सातत्य आणि विकासाचे प्रतीक आहे. मतदारांनी चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्यावी.”– मच्छिंद्र तापकीरउमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.






















Join Our Whatsapp Group