पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांनी आता प्रचाराची गती वाढवायला घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखे नंतर प्रचाराच्या प्रारंभाला खऱ्या अर्थाने जोर आला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याचं निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रभाग क्रमांक १५ चे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर जावळकर व चेतन बेंद्रे यांच्या प्रचाराला देखील मोठ्या गाजावाजाने सुरुवात झाली आहे.

या प्रचाराच्या निमित्ताने आकुर्डी मधील नागरिकांनी लक्षणीय उपस्थिती दाखवली. आणि प्रचारात दिसणारा नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह हा एका नव्या बदलाच्या दिशेने वाटचाल करणारा देखील दिसला.

आता सुरुवात झाली आहे. पुढे प्रचाराला अजून रंगत येत जाईल. पण या प्रचाराच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना पक्ष या दोन उमेदवारांच्या रूपाने निवडणुकीचे चित्र रंगवेल तर शंका नाही.






















Join Our Whatsapp Group