पिंपरी (Pclive7.com):- एकजुटीचा आणि विजयाचा एल्गार देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२ मध्ये आज रविवार (दि.०४) भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. परिवर्तनाच्या या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक ३२ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. निशा वसंत कांबळे, प्रसाद उत्तम शिंदे, उज्वला सुनील ढोरे आणि अतुल नामासाहेब शितोळे यांच्या प्रचारार्थ या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांचा उत्साह, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास यांचे प्रतीक म्हणून ही रॅली विजयाच्या दिशेने एक मजबूत पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ही बाईक रॅली दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली असून दत्त आश्रम, सांगवी येथून रॅलीस प्रारंभ होणार आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “तुमची उपस्थितीच आमची खरी ताकद आहे,” असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघटनात्मक जोर आणि जनसमर्थन स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






















Join Our Whatsapp Group