चिंचवड (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत महादेव डांगे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी चिंचवडचे आमदार शंकरशेठ जगताप तसेच राहुलदादा कलाटे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. हेमंत डांगे यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १८, चिंचवड येथील भाजपाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कार्यकर्त्यांच्या मोठ्या सहभागामुळे यावेळी उत्साहाचे वातावरण होते. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून आपण पक्षात प्रवेश केल्याचे हेमंत डांगे यांनी यावेळी सांगितले. तसेच भाजप नेतृत्वाने त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे स्वागत करत आगामी काळात पक्षवाढीसाठी महत्त्वाची भूमिका निभावण्याची अपेक्षा व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group