पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १५ मध्ये गुरुवारी सायंकाळी जे काही घडले, ते पाहता “निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव” हे वाक्य फिके पडावे आणि “निवडणूक म्हणजे थेट रणांगण” असे म्हणावे, अशीच परिस्थिती निर्माण झाली. गंगानगरमधील मार्बल गणपती मंदिर परिसरात सायंकाळी ५.३० वाजता भाजपच्या अधिकृत पॅनेलचा प्रचार सुरू झाला आणि वातावरण अक्षरशः तापले. ढोल-ताशांचा कडकडाट, घोषणांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग १५ हे केवळ वॉर्ड न राहता राजकीय प्रयोगशाळा बनल्याचे चित्र दिसून आले. “इथे निवडणूक आहे की शक्तिप्रदर्शन?” असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती होती. प्रभाग १५ मध्ये राजकीय तापमान इतके वाढले की, थंडीचा हंगामही हरखून गेला!

भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे हे चौघेही आत्मविश्वासाच्या चिलखतात सज्ज होऊन मैदानात उतरले होते. त्यांच्या सोबत माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसेविका वृषाली मोरे, सलीम भाई शिकलगार, नरेंद्र येरकर, सुहास करडे, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, राजू कुलकर्णी, कौस्तुभ घोडके, रितेश बंडगर, विजय शिनकर, खेमराज काळे आदी मान्यवर उपस्थित होते. भाषणांपेक्षा टोमणे अधिक आणि आश्वासनांपेक्षा आत्मविश्वास जास्त—हीच या प्रचाराची खरी ओळख होती.

या प्रचार फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मोठे नेतेच नव्हे, तर प्रभागातील “खरे मतदार” मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बोर्लीकर काका, तेजस डेरे, पांडुरंग मोहिते, शिवाजी वाघमारे, शेलार काका, मारणे काका, बबनराव लोखंडे, प्रभू देवा, मंगेश खंडाळे योगेश काळे शुभम काळे सुभाष ताकवणे रामभाऊ गायकवाड सुमीत बागल तेजस देसाई प्रवीण जगताप उमेश काकडे, अनिकेत पवार, गौरव कुलकर्णी, निखिल पांढरकर, महेश पवार, आकाश जाधव, चंदू घाडे, तावरे काका, तनपुरे अण्णा, बंगाळ काका—ही यादी पाहिली की प्रचार नव्हे तर गावसभा भरल्याचा भास व्हावा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर “यंदा तुम्हीच नगरसेवक ” असा स्पष्ट भाव दिसत होता.
महिलांची उपस्थितीही तितकीच ठळक होती. राधिका बोर्लीकर, शुभांगी करडे, दीपा तारू, सुरेखा वाघमारे, प्रभू ताई, देढे काकू, पालांडे काकू यांच्यासह अनेक महिलांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. हे दृश्य पाहता—“ही निवडणूक पुरुषांची नाही, ही प्रभाग १५ ची सामूहिक बंडखोरी आहे!” एकूणच, प्रभाग १५ मध्ये आता निवडणूक नाही, तर इतिहास लिहिला जातो आहे.






















Join Our Whatsapp Group