वाकड (Pclive7.com):- प्रभाग क्र.२५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. ताथवडे, पुनावळे, वाकड, माळवाडी परिसरात नव्या नेतृत्वांना चेतन पवार व सागर ओव्हाळ यांना संधी दिली आहे. त्यांनी प्रभागातील घरोघरी, सोसायटी टू सोसायटीमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या. महिलांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वरती असलेला शिवसैनिकांचा ठाम विश्वास दिसत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या अधिकृत उमेदवार सागर ओव्हाळ (अ गट) आणि चेतन पवार (ड गट) यांनी प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत मशाल निवडणूक चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवले आहे. प्रभागातील महिलांचा शिवसेनेच्या उमेदवारांना घट्ट पाठिंबा देत असल्याचे दिसून येते. प्रभागाच्या विकासाला साथ देणारे कडवे शिवसैनिक युती मधील पक्ष मिळून मिसळून सामान्य नागरिक फसवत आहेत. सत्तेतील पक्ष्याच्या साठलोट्याला जनता वैतागले आहेत.

प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले. औक्षण करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून पॅनेलला भरघोस मतदान करणार असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.






















Join Our Whatsapp Group