पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष शुभम माधवराव मुळे यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लाडंगे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शुभम मुळे यांच्यासोबत युवा सेनेचे हर्षल थोरात, अक्षय जगताप, अक्षय लोंढे, हितेश कांबळे, शाम ठाकुर, कार्तिक स्वामी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजप संघटना अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

या प्रवेशाचा थेट फायदा पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, अशोक थिएटर परिसर, जिजामाता हॉस्पिटल तसेच प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपा–आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार उषाताई वाघेरे, मोनिकाताई निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांना होणार असून, प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे चित्र आहे. या प्रवेशावेळी आमदार महेश लाडंगे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत, संघटनात्मक बांधणी मजबूत करून विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group