भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार विलास लांडे यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी शांततेत मतदान केले.

महापालिका निवडणुकीत विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडे हे निवडणुकीच्या रिंगणात असून, यामुळे भोसरी परिसरात निवडणुकीबाबत विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले, “मतदान करणे हे आपले कर्तव्य असून लोकशाहीने दिलेला हा महत्त्वाचा अधिकार आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आवर्जून मतदान करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांची गर्दी दिसून येत असून, प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group