पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन तासांत शहरात एकूण ६.५६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात एकूण १,१२,३८१ एवढे मतदान झाले आहे. त्यामध्ये ६९,३३८ पुरुष आणि ४३,०४३ महिला यांचा समावेश आहे.

सकाळी मतदान केंद्रे उघडताच नागरिकांनी मतदानासाठी उपस्थिती दर्शवली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून आला. शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदान केंद्रांवर सुरळीत आणि शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोग व महापालिका प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारनंतर आणि सायंकाळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासनाने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी.
























Join Our Whatsapp Group