पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

प्रभाग क्रमांक २८ अंतर्गत पिंपळे सौदागर–रहाटणी येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी नागरिकांनी लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, मतदारांमध्येही मतदानाबाबत उत्साह दिसून येत आहे.






















Join Our Whatsapp Group