पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी उद्या, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता महापालिका हद्दीतील निश्चित केलेल्या ८ ठिकाणी सुरू होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तीला ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ येथील मतमोजणी स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, से.क्र. २६, निगडी येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १० साठी मतमोजणीच्या १७ फेऱ्या, प्रभाग क्रमांक १४ व १९ साठी प्रत्येकी १८ फेऱ्या तर प्रभाग क्रमांक १५ साठी मतमोजणीच्या १५ फेऱ्या होणार आहेत.
प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ येथील मतमोजणी ऑटो क्लस्टर येथील छोटा हॉल, चिंचवड येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १६ व २२ साठी मतमोजणीच्या प्रत्येकी १४ फेऱ्या तर प्रभाग क्रमांक १७ व १८ साठी प्रत्येकी १६ फेऱ्या होणार आहेत.
प्रभाग क्रमांक ०२, ०६, ०८ व ०९ येथील मतमोजणी संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २ साठी मतमोजणीच्या २१ फेऱ्या, प्रभाग क्रमांक ६ साठी मतमोजणीच्या १७, प्रभाग क्रमांक ८ साठी २० फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक ९ साठी मतमोजणीच्या १८ फेऱ्या होणार आहेत.

प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ येथील मतमोजणी ड क्षेत्रीय कार्यालय, औंध-रावेत बीआरटी रोड, रहाटणी येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २५ व २९ साठी मतमोजणीच्या प्रत्येकी २० फेऱ्या, प्रभाग क्रमांक २६ व २८ साठी प्रत्येकी २१ फेऱ्या होणार आहेत.
प्रभाग क्रमांक ०३, ०४, ०५ व ०७ येथील कबड्डी प्रशिक्षण संकुलच्या तळमजल्यावर स्ट्राँग रूम व पहिल्या मजल्यावर मतमोजणी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरीच्या मागे येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ०३ साठी मतमोजणीच्या १८ फेऱ्या तर प्रभाग क्रमांक ४, ५ व ७ साठी प्रत्येकी १६ फेऱ्या होणार आहेत.
प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ येथील मतमोजणी सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, सी-१ इमारतीसमोर, घरकुल चिखली टाऊनहॉल, चिखली येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १ साठी मतमोजणीच्या १७ फेऱ्या, प्रभाग क्रमांक ११ साठी मतमोजणीच्या १६ फेऱ्या, प्रभाग क्रमांक १२ साठी मतमोजणीच्या १४ फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक १३ साठी मतमोजणीच्या १५ फेऱ्या होणार आहेत.
प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ येथील मतमोजणी स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २१ साठी मतमोजणीच्या १७ फेऱ्या, प्रभाग क्रमांक २३ साठी मतमोजणीच्या १० फेऱ्या, प्रभाग क्रमांक २४ साठी १४ फेऱ्या तर प्रभाग क्रमांक २७ साठी मतमोजणीच्या १६ फेऱ्या होणार आहेत.
प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ येथील मतमोजणी मनपाचे कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल) तळमजल्यावर मतमोजणी व दुसऱ्या मजल्यावर स्ट्राँग रूम, कासारवाडी येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २० साठी मतमोजणीच्या २० फेऱ्या, प्रभाग क्रमांक ३० साठी मतमोजणीच्या १६ फेऱ्या, प्रभाग क्रमांक ३१ साठी १९ फेऱ्या तर प्रभाग क्रमांक ३२ साठी मतमोजणीच्या १७ फेऱ्या होणार आहेत.






















Join Our Whatsapp Group