पिंपरी (Pclive7.com):- माजी महापौर अपर्णा डोके यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करणारी फेसबुक पोस्ट करत EVM च्या चिन्हासमोरील बटण दाबताना मोबाईलवर फोटो काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अपर्णा डोके या उमेदवार असून, निलेश डोके हे त्यांचे पती आहेत. संबंधित प्रकरणाची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईलचा वापर करून EVM चा फोटो काढणे हे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणाची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group