पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला शहराध्यक्षा आणि महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार सुजाता पालांडे यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा उमेदवार योगेश बहल यांच्या समर्थकांनी घुसखोरी करत घरातील सदस्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पालांडे यांनी केला आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

दरम्यान, भाजपच्या उमेदवार सुजाता पालांडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी या घटनेच्या निषेधार्थ संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरू केले आहे. योगेश बहल यांच्या समर्थकांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे दाखल झाल्या असून, त्यांनीही बहल समर्थकांना अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, कायदेशीर कारवाईबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे संत तुकाराम नगर परिसरात वातावरण चांगलेच तापले आहे.






















Join Our Whatsapp Group