भोसरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. भोसरी येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.

या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील थेट संघर्षामुळे प्रचाराला मोठी रंगत आली होती. प्रचाराच्या काळात दोन्ही नेत्यांकडून टोकाचे आरोप-प्रत्यारोप आणि जोरदार टीका करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीकडे केवळ शहराचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता मतदारांनी दिलेल्या कौलातून नेमका कोणाचा वरचष्मा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















Join Our Whatsapp Group