पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाला. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मतदार याद्यांमध्ये गंभीर घोळ असून बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. घटनेबाबत निवडणूक प्रशासनाकडून पुढील चौकशी व आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group