पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. महावितरणच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेतल्यानंतर मोहननगर येथील अपघाताला कारणीभूत ठरणारी दगडी फरशी तत्काळ काढण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

मोहननगर येथील दगडी फरशीमुळे अनेक वेळा महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे अपघात झाले होते. ही दगडी फरशी काढावी अशी अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती. त्यानुसार अ क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांनी बालब्रह्मचारी श्री सिदाजी आप्पा चौक येथील दगडी फरशी काढण्याबाबत व फुथपाथ (पदपथ) अरुंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर स्थापत्य विभागाच्या कनिष्ठ अभियंता अंकिता मोरे यांनी घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका अरुणा लंगोटे, गणेश लंगोटे, सागर पुंडे, सोमनाथ अलंकार, विठ्ठल कराळे, उदय नामदे यावेळी उपस्थित होते. फरशी बदलण्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश तिन्ही नगरसेवकांनी दिले. त्यानुसार हे काम लवकरच सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नागरिकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे तिन्ही नगरसेवक यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group