पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार? याची राजकीय चर्चा सुरू झाली होती. बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. बीड आणि पुण्याचे पालकत्व आजपासून सुनेत्रा पवार यांच्याकडे राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत सुनेत्रा अजित पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (३ फेब्रुवारी २०२६) यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group