चिंचवड (Pclive7.com):- अंध व निराधार मुला-मुलींचे संगोपन, शिक्षण तसेच त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी किवळे येथे कार्यरत असलेली माई बाल भवन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे. या संस्थेमार्फत अंध अनाथ मुला-मुलींचे संगोपन करून त्यांना शिक्षण दिले जाते, त्यांच्या विवाहाची व्यवस्था केली जाते तसेच काहींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, जेणेकरून भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.

माई बाल भवन संस्थेच्या वतीने नुकताच किवळे येथे दोन अंध निराधार मुलींचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी येणाऱ्या खर्चासाठी संस्थेने वुई टुगेदर फाउंडेशनकडे मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सर्व सदस्यांना मदतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
फाउंडेशनच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी एकत्र येत या नवदांपत्यास २१,१११ रुपये रोख रक्कम आहेर स्वरूपात दिली तसेच त्यांच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या आर्थिक मदतीमुळे या दोन्ही मुलींच्या विवाहाला मोठा हातभार लागला. त्यामुळे माई बाल भवन संस्थेचे पदाधिकारी तसेच उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रविंद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रविंद्र सागडे यांच्यासह नंदकुमार वाडेकर, अनिल शिंदे, शंकर कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, राजेंद्र महाले, सरिता कुलकर्णी, विलास कडेकर, दारासिंग मन्हास, सलीम सय्यद, सीता केंद्रे, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, के. रंगराव, धनराज गवळी, रमाकांत उजळंबकर, उदय कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, श्रीरंग दाते, अर्जुन पाटोळे, एम. के. शेख, अपर्णा अष्टीकर, जावेद शेख, अनिल पोरे, झाकीर सय्यद, हनीफ सय्यद, राजेंद्र ताठे, रवी इंगळे, दत्तात्रय शेटे आदी सदस्यांनी आर्थिक मदतीचा पुढाकार घेतला.
यावेळी माई बाल भवन संस्थेचे संचालक मधुकर इंगळे यांनी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.






















Join Our Whatsapp Group