पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वाकड परिसरातील ‘इटर्नल फॅमिली स्पा’ येथे सोमवारी (दि.०२) सायंकाळी छापा टाकून चार पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी ‘स्पा’ व्यवस्थापकाला अटक केली आहे.

अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय ३२, रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ रा. जमुनामुख, जि. लंकानागाव, आसाम) असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाणे हद्दीतील ‘इटर्नल फॅमिली स्पा’ येथे छापा टाकला. पिटा कायदा कलम १८ (१) (अ) अंतर्गत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी चिंचवड पोलिस ठाणे हद्दीमधील ‘निक्की लॉज’, काळेवाडी पोलिस ठाणे हद्दीतील ‘लेमन ग्रास थाई स्पा’ आणि सांगवी हद्दीतील ‘औरा थाई स्पा’ या तीन आस्थापना एक वर्षासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते, सहायक निरीक्षक वैशाली शेंडगे यांच्या पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group