पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे झाडे लावण्याचे टेंडर मिळवून देतो असे सांगून एका तरुणाची ११ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २० एप्रिल २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४ दरम्यान भोसरीतील लांडगे आळी येथे घडली. संदेश नंदकुमार लांडगे (३२, रा. साई निवास, लांडगे आळी, भोसरी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजित संतोष गायकवाड (रा. दिघी रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून टेंडर मिळवण्यासाठी वेळोवेळी १७ लाख ४९ हजार रुपये घेतले. त्यापैकी फक्त ५ लाख ८८ हजार रुपये परत केले. टेंडर मिळाल्याचे खोटे सांगून आरोपीने बनावट पत्राची प्रत फिर्यादीला दिली आणि त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलिस तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group