पिंपरी (Pclive7.com):- उत्तर प्रदेशातील कानपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय नानचाकू स्पर्धा व पंच सेमिनार स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेत देशभरातून सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्रातील खेळाडूंनी फ्री-स्टाइल, काथा आणि कुमिते या खेळ प्रकारांत चमकदार कामगिरी केली. एकांतिका रेड्डी, स्वरा हवळने, स्वरूप एकावडे, अयान शेख, स्वरूपा नामदे, आरुष मोरे, खुशी गुप्ता, अनन्या माने, तृप्ती वाडकर, जिक्रा खान, ओवी मालुसरे, आराध्या मालुसरे, सोहम मालुसरे, युवराज मालुसरे, शिवराज मालुसरे आणि आर्यन जोरवर यांनी पदके जिंकली.
दीपक शिर्के, स्वरूप एकवाडे, अनिल शिंदे, विजय कांबळे, रिदम तिवारी, स्वरा जाधव आणि अक्सा मुल्ला यांनी पंच परीक्षा पूर्ण केली. महाराष्ट्र नानचाकू संघाचे महासचिव दीपक शिर्के यांचे मार्गदर्शन मिळाले. नानचाकू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रोहित सक्सेना, अध्यक्ष संजय कपूर आणि महासचिव बाबूल वर्मा यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्राच्या संघाने शिस्तबद्ध खेळ, तांत्रिक कौशल्य आणि संयमाच्या जोरावर पदकतालिकेत मानाचे स्थान मिळवले. या यशामुळे राज्यातील नानचाकू खेळाडूंमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. या यशाबद्दल खेळाडूंसह प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भविष्यातील स्पर्धासाठी संघाकडून भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group