
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक-युवतींसाठी रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. “आमचा निर्धार, तरुणांना रोजगार” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून पात्र उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण तसेच सर्व शाखांतील पदवीधर आणि पदविकाधारक उमेदवारांना मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी मिळणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

रोजगार मेळावा रविवारी, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत इंद्रायणीनगर येथील सेक्टर क्रमांक १ मधील वेणूमाता प्राथमिक शाळेजवळील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९७६७२२१६१६ आणि ८४१२००१६३६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags: ravi landge






















Join Our Whatsapp Group