पिंपरी (Pclive7.com):- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत करण्यात आलेल्या या रोषणाईमुळे संपूर्ण महापालिका भवन तिरंग्याच्या रंगांनी सजले असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचे प्रतीक म्हणून इमारतीवर विविध रंगांची प्रकाशयोजना करण्यात आली आहे. संध्याकाळच्या वेळेस ही रोषणाई अधिक उठावदार दिसत असून परिसरात देशभक्तीचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाने विशेष नियोजन करून ही आकर्षक प्रकाश सजावट साकारली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील नागरिकांना राष्ट्रीय अभिमानाची अनुभूती देण्याच्या उद्देशाने ही रोषणाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिका भवनावरील या विद्युत रोषणाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला इमारतीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.






















Join Our Whatsapp Group