पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या सासरच्या मंडळींविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली गायकवाड यांनी परवा सायंकाळी मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 व 352 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादीनुसार, पती नागेश गायकवाड यांच्या मृत्यूनंतर सोनाली यांना वारंवार टोमणे मारले जात होते. तसेच पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या आर्थिक मदतीच्या रकमेसंदर्भात घरात वाद होत होते. याशिवाय त्यांना दोन मुली असल्याच्या कारणावरूनही मानसिक त्रास व छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या सततच्या मानसिक छळामुळे सोनाली गायकवाड यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






















Join Our Whatsapp Group