पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील कस्तुरी चौक परिसरात द्रोपदा लॉन्स समोरील ‘हायमास्ट लाईट’चा पाया खचल्याची गंभीर बाब भाजपाच्या नगरसेविका सौ. श्रुती राम वाकडकर यांना पाहणी दरम्यान निदर्शनास आली. संभाव्य धोका लक्षात घेता त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

प्रभागातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करताना ही बाब नगरसेविका श्रुती वाकडकर यांच्या द्रोपदा लॉन्स समोरील ‘हायमास्ट लाईट’चा पाया खचल्याची गंभीर बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. याचवेळी अटलांटा-2 ते कस्तुरी चौक तसेच कस्तुरी चौक ते विनोदे कॉर्नर या मार्गावरील दोन्ही बाजूंचे फुटपाथ नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित पादचारी वाहतुकीसाठी नव्याने विकसित करण्याचे निर्देशही नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी दिले.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, दर्जेदार व वेळेत विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असे सौ. श्रुती राम वाकडकर यांनी सांगितले. या पाहणीदरम्यान पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षित प्रवासासाठी कटिबद्ध असल्याचे नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group