पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील निगु ट्रान्सपोर्ट नगर परिसरात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. ट्रान्सपोर्ट नगर येथील परिसरात असलेल्या लक्झरी बस पार्किंगमध्ये अचानक आग लागल्याने तीन लक्झरी बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

ही धक्कादायक घटना आज रात्री साडेनऊच्या सुमारास
घडली. बसला आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group