चिंचवड (Pclive7.com):- जुन्या वादातून चिंचवड येथे एका २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी दुपारी केशवनगर, मराठी शाळेसमोर ही घटना घडली. फिर्यादी आशीष संतोष वराडे (वय २२, रा. चिंचवड) हे त्या ठिकाणी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने कोयता व लोखंडी रॉडने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस जबरदस्तीने स्विफ्ट कार मध्ये बसवून चिंचवड येथील गावडे जलतरण तलाव परिसरात नेले. तेथेही त्यांच्यावर कोयता व लोखंडी काड्याने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी विकी अनिल घोलप (वय ३१, रा. शिरगाव परंदवाडी मावळ), मयूर अनिल घोलप (वय ३३ रा. शिरगाव परंदवाडी मावळ), शुभम विनायक चौधरी वय २९, रा. गावडे भोईर आळी चिंचवडगाव), आदित्य अशोक चव्हाण (वय २९, रा. भीम नगर चिंचवड गाव), मंगेश नंदकुमार सांगळे (वय २७, रा. काकडे पार्क चिंचवड), प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे (वय २३ रा. मोरे वस्ती चिखली), समीर कोंडीराम भोईर (रा. चिंचवड) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group