पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सागर कोकणे ॲक्शन मोडवर आले आहेत. रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणाचे काम सागर कोकणे यांनी हाती घेत पूर्ण केले आहे. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त रहाटणी चौकातील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण त्यांनी प्रशासनाच्या मदतीने करून घेतले आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रंगरंगोटी, स्वच्छता आणि देखभालीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सागर कोकणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शिवरायांच्या पुतळा परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण व्हावे यासाठी सागर कोकणे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेकडे विशेष पाठपुरावा केला होता. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत काम तातडीने पूर्ण केले.

या कामाबद्दल नगरसेवक सागर कोकणे यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. शिवजयंती उत्सव अधिक भक्तिभावात आणि गौरवशाली वातावरणात साजरा व्हावा, हाच यामागील प्रामाणिक उद्देश असल्याचे नगरसेवक सागर कोकणे यांनी स्पष्ट केले.






















Join Our Whatsapp Group