वाढदिवसानिमित्त डस्टबीन वाटप व ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी
पिंपळे सौदागर (Pclive7.com) :- उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे आणि नगरसेविका डाॅ. कुंदा संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले. प्रभाग क्रमांक २८ अंतर्गत पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर भर देत डस्टबीन वाटप तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी परिसरात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळी ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशन, विठाई वाचनालय, आनंद हास्य क्लब, नवचैतन्य हास्य क्लब, कोकणे चौक हास्य क्लबचे सदस्य आणि पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत नगरसेविका डॉ. कुंदा भिसे म्हणाल्या की, प्रभागातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याला पूरक म्हणून माझे पती संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहिमेला सक्रिय पाठबळ देत सोसायट्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबीन वाटप केले. कचरा वर्गीकरणामुळे पुनर्वापर प्रक्रियेला चालना मिळून प्रभाग आणि पर्यायाने शहर स्वच्छ राहण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

संजय भिसे यांनी सांगितले की, पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणामुळे शहरामध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पिंपळे सौदागर आणि रहाटणी प्रभागात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यावर भर दिला जात आहे. भविष्यात अधिक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
”या उपक्रमामुळे प्रभागात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक कार्याद्वारे समाजात जनजागृती निर्माण करण्याचा भिसे दाम्पत्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.– जेष्ठ नागरिक





















Join Our Whatsapp Group